देश

हिमाचलमध्ये राहुल ब्रिगेडकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची औपचारिक निवड होण्याला उरलेला अल्प कालावधी पाहता पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यादेखील राहुल ब्रिगेडकडे येणे सुरू झाले आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या अर्ज छाननी समितीत राहुल गांधींच्या खास वर्तुळातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबरला निवडणूक आहे. यासाठी कॉंग्रेसतर्फे आज अर्ज छाननी समितीची घोषणा करण्यात आली. तीनसदस्यीय समितीचे प्रमुखपद राहुल यांचे निकटवर्तीय जितेंद्रसिंह यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. जितेंद्रसिंह हे यूपीए सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते. पंजाबचे आमदार विजय इंदर सिंगला आणि आसामातील खासदार गौरव गोगोई समितीचे सदस्य आहेत.

विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्याच नेतृत्वाखाली कॉंग्रेसने निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. राज्यात नवे नेतृत्व पुढे आणण्याच्या राहुल गांधींच्या रणनीतीअंतर्गत प्रदेशाध्यक्ष सुखविंदरसिंग ऊर्फ सुख्खू यांना झुकते माप मिळाल्यानंतर मुख्यमंत्री वीरभद्रसिंह संतप्त झाले होते. अखेर राहुल गांधींनी यात हस्तक्षेप करून वीरभद्रसिंह हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहतील, असे स्पष्ट केले; परंतु सुख्खू यांना कोणत्याही परिस्थितीत प्रदेशाध्यक्षपदावरून काढले जाणार नाही, असाही इशारा वीरभद्र गटाला दिला आहे. साहजिकच आपापल्या समर्थकांना उमेदवारी देण्यावरून दोघांत चढाओढ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी अर्ज छाननी समितीची भूमिका निर्णायक राहील.

दरम्यान, हिमाचलमध्ये सत्ता टिकविण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, भाजपने वीरभद्रसिंह सरकारच्या भ्रष्टाचाराचे भांडवल केले आहे. अलीकडेच मोदींनी प्रचारसभा घेऊन "संपूर्ण कॉंग्रेस पक्ष जामिनावर' असल्याची तोफ डागली होती; तर कॉंग्रेसनेही आता भाजपचा भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनविण्याची रणनीती ठरविली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीची अवघ्या एका वर्षात 80 कोटी रुपयांवर पोचलेली उलाढाल यावरून भाजपला घेरण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न राहील, असे हिमाचल प्रदेशच्या सहप्रभारी व कॉंग्रेस खासदार रंजित रंजन यांचे म्हणणे आहे. वीरभद्रसिंह यांच्यावरील भाजपचे कथित सहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप विरुद्ध 80 कोटींचा भ्रष्टाचार हा मुद्दा जनतेपर्यंत पोचविण्याची कॉंग्रेसने तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT