new delhi rahul gandhi reaction after pm modi speech in lok sabha 
देश

'पंतप्रधान मोदी 'त्या' मुद्द्यावर एक शब्दही बोलले नाही'; राहुल गांधींची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन दिले. त्यावेळी पंतप्रधान मोदींचा संपूर्ण रोख काँग्रेसवर होता. पण, असे मुद्दे उपस्थित करून, पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहे. मूळ मुद्द्यांपासून भरकटत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर मीडियाशी बोलाताना केली.

काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान मोदींची भाषणाची स्टाईल देशातील जनेताल मूळ मुद्द्यांपासून दूर लोटत आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. पण, देशातील कळीचे मुद्दे बाजूलाच ठेवले. सध्या देशापुढं बेरोजगारी हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. यावर आम्ही अनेकदा त्यांच्याशी बोलणं केलं आहे. पण, त्यांनी आपल्या निवेदनात या मुद्यावर एक शब्दही काढला नाही. पंतप्रधान मोदींचं सोडून द्या. पण, अर्थमंत्र्यांनी खूप मोठं भाषण केलं, पण त्यांनीही या मुद्द्यावर चकार शब्द काढला नाही.' 

लोकसभेत राहुल गांधी भडकले 
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेसच्या मार्गानं चाललो असतो, तर अनेक कामं झाली नसती, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेतला. देशातील तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही तर, ते लाठ्या हाणतील, अशी टीका राहुल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींवर केली होती. त्यावर लाठ्या खाण्यासाठी मी सूर्यनमस्कार वाढवतो आणि पाठ मजबूत करून घेतो, असं उत्तर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिलं. त्यावेळी राहुल यांनी पंतप्रधानांना थांबवत 'माझे म्हणणे नीट समजून घ्या', असा सल्ला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT