amritpal singh 
देश

Amritpal Singh : 'अमृतपाल'विरोधात नवीन एफआयआर; 'त्या' सात जणांना 23 मार्चपर्यंत कोठडी

सकाळ डिजिटल टीम

Amritpal Singh : पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता एक नवीन एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांनी पहिल्यांदा २३ फेब्रुवारी रोजी अजनालाप्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी त्याच्या सात सहकाऱ्यांना जालंधरच्या मेहतपूरजवळ ताब्यात घेतलं. त्या सात जणांना आता २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. अवैधरितीने शस्त्र बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला. अमृतसर (ग्रामीण)चे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सतिंदर सिंह यांनी सांगितलं की, अमृतपालचे सात सहकाऱ्यांना शस्त्र अधिनियमातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

एसएसपी यांनी सांगितलं की, आम्ही काल रात्री शस्त्र अधिनियमांतर्गत एक नवीन एफआयआर दाखल केला. यामध्ये अमृतपाल मुख्य आरोपी आहे. शनिवारी अमृतपालच्या ७८ सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र अमृतपाल अजूनही फरार आहे. सलग तिसऱ्या दिवशी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, अमृतपालचे वडील तरसेम सिंग यांना अमृतपाल संदर्भात विचारले असता, त्यांना त्यांचा मुलगा कुठे आहे हे माहिती नसल्याचे स्पष्ट सांगितलं. तसेच, मला स्वतः अमृतपालबद्दल काही योग्य माहिती मिळवायची आहे. पोलिसांनी त्यांच्या घरात ३ ते ४ तास शोधमोहीम राबवल्याचे त्यांनी सांगितले.

अमृतपालच्या अटकेची माहिती शनिवारी दुपारी आली, मात्र पोलिसांनी रात्री उशिरा काढलेल्या अधिकृत प्रेस स्टेटमेंटमध्ये तो फरार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी 'वारीस पंजाब दे' संघटनेशी संबंधित 78 जणांना अटक केली आहे.

इंटरनेट सेवा बंद

पंजाब सरकारकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, पंजाबच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रात सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा १८ मार्च ते १९ मार्च पर्यंत बंद केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT