देश

ऐतिहासिक कालका मेलला रेल्वेचा नव्या रंगरूपाचा साज 

पीटीआय

धनबाद : लोहमार्गावर गेली 152 वर्षे धावणाऱ्या कालका मेल या ऐतिहासिक गाडीचे रूपडे रेल्वेने बदलले आहे. स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस याच गाडीतून गोमो स्थानकातून पेशावरला गेले होते. पश्‍चिम बंगालमधील हावड्यापासून हरियानातील कालकापर्यंत ही गाडी धावते. गांधी जयंतीचे निमित्त साधून रेल्वेने या गाडीला नवा साज दिला आहे. 

ईस्ट इंडिया रेल्वेकडून प्रारंभ 

ब्रिटिश राजवटीत तेव्हाच्या ईस्ट इंडियन रेल्वेने एक जानेवारी 1866 रोजी हावडा-कालका मेलला हिरवा झेंडा दाखविला होता. ही गाडी तेव्हा दिल्लीपर्यंत धावत असे. ब्रिटिश साम्राज्याचे उच्चाधिकारीच तेव्हा या गाडीने प्रवास करू शकत. गाडीने हा प्रवास 25 वर्षे केल्यावर हिमाचल प्रदेशाच्या पायथ्याला असलेल्या कालकापर्यंत तिचा पल्ला वाढविण्यात आला.

व्हॉइसरॉय आणि अन्य उच्चाधिकाऱ्यांना तेव्हाची उन्हाळी राजधानी असलेल्या सिमल्याला जाणे सोईचे व्हावे म्हणून गाडीचा पल्ला वाढविला गेला. त्यासाठी 1891 मध्ये लोहमार्गाचा विस्तार करून तो कालकापर्यंत नेण्यात आला. 2016 मध्ये या गाडीने सेवेची 150 वर्षे पूर्ण केली. 

आकर्षक रंगसंगती 

या गाडीच्या सामान्य श्रेणीपासून वातानूकुलित वर्गापर्यंतच्या डब्यांना बाहेरून क्रिम आणि आतून आकाशी रंग देण्यात आला असून, सामान्य श्रेणीच्या डब्यांमधील आसनव्यवस्था अधिक आरामदायी करण्यात आली आहे. शयनयान श्रेणीच्या प्रवासी डब्यांमध्ये मॉड्युलर टॉयलेटची सोय करण्यात आली असून, प्रवाशांना टॉवेलही दिले जातात. गाडीच्या पेंट्री कारची रचनाही बदलण्यात आल्यामुळे तेथे घाण साठणार नाही. 

सुभाषबाबूंची स्मृती 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीसाठी गोमो स्थानकाला त्यांचे नाव देण्यात आले असून, हे स्थानक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमो जंक्‍शन या नावाने ओळखले जाते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT