New Parliament Inauguration esakal
देश

New Parliament Building: संसद ही अहंकाराच्या विटांनी बनलेली नसून घटनात्मक...; राहुल गांधी उद्घाटन सोहळ्यावरुन आक्रमक

रुपेश नामदास

New Parliament Inauguration: नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्रातून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील कार्यक्रमासाठी जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे की, 'राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन न करणे आणि त्यांना समारंभासाठी निमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे. संसद ही अहंकाराच्या विटांनी बनलेली नसून घटनात्मक मूल्यांनी बनलेली आहे' तर याआधी राहुल गांधी म्हणाले होते की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे पंतप्रधानांनी नाही.

देशातील प्रमुख राजकीय विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटनावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करु नये, त्यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.

देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज्यासह देशातील अनेक छोटे मोठे पक्ष बहिष्कार टाकत आहेत. आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, तृणमूल काँग्रेसने, आम आदमी , सीपीआय या पक्षांसोबत इतर छोट्या पक्षांनी उद्घाटनावर भहिष्कार टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT