देश

Ram Mandir New Photos: राम मंदिराचे नवे फोटो आले समोर! प्रवेशद्वारावर असणार 'या' विशेष मूर्ती

राम मंदिराच्या उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या २२ जानेवारी रोजी या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पण टप्प्याटप्प्यानं ट्रस्टकडून मंदिराच्या खास गोष्टी उलगडल्या जात आहेत. आज नव्यानं ट्रस्टनं नवे फोटो समोर आणले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार विशेष मुर्त्या बसवण्यात येणार आहेत. (New photos of Ram Mandir entrance release by trust idols will be installed at entrance)

न्यासानं शेअर केले फोटो

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं ट्विट करत हे नवे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हत्ती, सिंह, हनुमान, गरुड पक्षी या चार मुर्त्यांचा समावेश आहे. या चारही मुर्त्या राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आल्या आहेत. यांची खास वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून या मुर्त्या साकारण्यात आल्या असून राजस्थानमधील बन्सी पहारपूर गावातील कारागिरांनी त्या घडवल्या आहेत. (Latest Marathi News)

प्रवेशद्वारावर बसवण्यात येणार मूर्ती

यामध्ये हत्ती, सिंह, हनुमान, गरुड हे चारही प्राणी शक्तीचे प्रतिक आहेत. त्यामुळं मंदिरात प्रवेश करताना भाविकांना शक्तीचं दर्शन व्हावं यासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच्या पायऱ्यांच्या बाजूला या मुर्त्या बसवण्यात येणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

२२ जानेवारीला होणार प्रतिष्ठापना

दरम्यान, २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देशभरात या सोहळ्याचं वातावरण तयार केलं जात आहे. यासाठी काही निवडक लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. याची इंग्रजी भाषेतील विशेष निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT