Shoe Size Bha eSakal
देश

Shoe Size Bha : साईज मॅटर्स! आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट

अमेरिका आणि यूके साईज सिस्टीमला बाजूला करून Bha मध्ये आठ नवीन साईजचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या साईज भारतीय पायांना समोर ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

Sudesh

India Shoe Sizing System : नवीन बूट खरेदी करताना कित्येकांचा साईजच्या बाबतीत गोंधळ उडतो. कारण बुटांच्या साईज या US, UK या प्रमाणानुसार असतात. US 9 आणि UK 9 या दोन्हीमध्ये भरपूर फरक आहे. दुकानामध्ये शूज घेताना आपण तो घालून बघू शकतो, त्यामुळे तिथे याची फारशी अडचण जाणवत नाही. मात्र, ऑनलाईन शूज घेताना बरेच जण गोंधळतात.

यामुळेच आता खास भारतीयांसाठी वेगळी प्रमाण सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. ही सिस्टीम Bha या अक्षरांनी रिप्रेझेंट केली जाईल. यामुळे शू साईज प्रमाणाच्या बाबतीत देखील भारत आत्मनिर्भर होणार आहे. काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने हे प्रमाण तयार केलं आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये याची माहिती देण्यात आली आहे.

सर्वेक्षण आणि रिसर्च करून निर्णय

'Bha' ही अक्षरे 'Bharat' मधून घेतलेली आहेत. इतर ठिकाणी India मधील IN वापरलं जात असताना, शू साईज प्रमाणासाठी Bha ही अक्षरे वापरण्यात येणार आहेत. हे प्रमाण तयार करण्यासाठी डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये एक लाखांहून अधिक भारतीयांच्या पायाची मापं घेण्यात आली. यानंतर अ‍ॅडव्हान्स 3D टेक्नॉलॉजीचा वापर करुन हे प्रमाण तयार करण्यात आलं.

सध्या उपलब्ध असलेल्या साईजिंग सिस्टीम (US, UK आणि इतर) आणि भारतीयांच्या पायाची मॉर्फोलॉजी यामध्ये प्रचंड तफावत असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं. पाश्चिमात्य देशातील लोकांच्या तुलनेत भारतीयांचे पाय अधिक ब्रॉड असतात. तसंच वयाच्या कोणत्या टप्प्यावर पाय पूर्णपणे विकसित होतो यामध्येही तफावत असते. यामुळेच कित्येक वेळा बूट एकतर खूप टाईट होतो किंवा खूप लूज.

आठ नव्या साईज

अमेरिका आणि यूके साईज सिस्टीमला बाजूला करून Bha मध्ये आठ नवीन साईजचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या साईज भारतीय पायांना समोर ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

  • Size 1 - o ते १ वर्षांपर्यंतच्या नवजात बालकांसाठी

  • Size 2 - १ ते ३ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी

  • Size 3 - ४ ते ६ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी

  • Size 4 - ७ ते ११ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी

  • Size 5 - १२-१३ वर्षांच्या मुलींसाठी.

  • Size 6 - १२ ते १४ वर्षांच्या मुलांसाठी

  • Size 7 - १४ वर्षांवरील महिलांसाठी

  • Size 8 - १५ वर्षांवरील पुरूषांसाठी

सुरुवातीच्या ट्रायलसाठी केवळ Size 3 ते Size 8 यावर फोकस करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 85 टक्के भारतीयांना फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT