Railway Cleaning Esakal
देश

Railway: आता करा दुर्गंधीमुक्त प्रवास, रेल्वे आणि परिसर स्वच्छ ठेणव्यासाठी होणार नव्या तंत्रज्ञानाचा वापर

Railway Passengers: गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी, रेल्वे, रेल्वे स्थानक आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे हैराण आहेत. आता रेल्वे प्रवाशांच्या याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन सरसावले आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी, रेल्वे, रेल्वे स्थानक आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे हैराण आहेत. आता रेल्वे प्रवाशांच्या याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन सरसावले आहे.

रेल्वे आणि स्थानक परिसरातून दुर्गंधी दूर करण्यासाठी रेल्वे नवीन रसायने आणि मानक जलप्रणाली वापराचा विचार करत आहे.

इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाला त्याच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गाड्यांची देखभाल आणि संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली.

रेल्वे आणि स्थानक परिसरात दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी Rail Madad ॲपवर येत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, रेल्वे बोर्डाने गंध शोधकांसाठी नवीन IoT आधारित चाचणीची शिफारस केली आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यासाठी मुंबईतील एका स्टार्टअपने विकसित केलेले तंत्रज्ञान उपयोग केला जाणार आहे.

या तंत्रज्ञानाचा प्रभाव जाणून घेण्यसाठी लिंके हॉफमन बुश आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी व्हेरियंटच्या काही डब्यांमध्ये ते वापरले जाणार आहे.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, BEML द्वारे निर्मित स्लीपर वंदे भारत गाड्या एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या दुर्गंधीमुक्त टॉयलेट सिस्टमसह सुसज्ज आहेत.

या गाड्यांमध्ये फर्स्ट एसी क्लासच्या डब्यांमध्ये गरम पाण्याने शॉवरची सुविधाही असेल. कोच वॉटरिंगमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि अर्गोनॉमिक डिझाइन्सचा अवलंब केला जात आहे.

आपल्या अधिकाऱ्यांना अलीकडेच लिहिलेल्या पत्रात, रेल्वे बोर्डाने ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी क्लोनन कॉन्सन्ट्रेटची चाचणी करण्याची शिफारस केली आहे.

भारतीय रेल्वे, ट्रेनमध्ये पाणी पुरविण्याची व्यवस्था सुधारण्याचा विचार करत आहे. शौचालय आणि वॉश बेसिन वापरताना प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT