देश

अनलॉक होत असताना आढळला कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : देशातीत कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यामुळे प्रत्येक राज्यानं लॉकडाउन शिथिल करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी लॉकडाउन उठवला आहे. मात्र, चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. कोरोनाच्या डेल्टा विषाणूनं (बी.१.६१७.२) आपलं रुप पुन्हा बदललं आहे. या विषाणूला ‘डेल्टा प्लस’ असं म्हटलं जात आहे. अनलॉक होत असतानाच विषाणूनं आपलं रुप बदलल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

‘डेल्टा’ या कोरोना विषाणू प्रकारामध्येही उत्परिवर्तन (म्युटेशन) झाले असून त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ हा नवा प्रकार निर्माण झाला असल्याचे सोमवारी रात्री शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र, ‘डेल्टा प्लस’ या विषाणूमुळे संसर्ग झाल्याची उदाहरणे अत्यंत कमी असल्याने चिंता करण्यासारखे सध्या काही नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अ‍ॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे शास्त्रज्ञानं याबाबत ट्वीट केले आहे.

डेल्टा प्रकार प्रथम भारतात आढळून आला होता. या विषाणूमुळेच भारतात दुसरी लाट आल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत ‘डेल्टा प्लस’ विषाणूनं धोक्याचा इशारा दिला आहे. ‘डेल्टा प्लस’ या नव्या प्रकाराच्या विषाणूमुळे कोरोनाची लागण कितपत आधिक असू शकते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विषाणूचा हा प्रकार मोनोक्लोनल प्रतिपिंड मिश्रण या कोरोनावरील उपचारांना दाद देत नाही, असेही समोर आलं आहे. नुकतीच भारतामध्ये या उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, प. बंगाल आणि कर्नाटक या राज्यात लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. तर काही राज्यातील परिस्थिती आटोक्यात न आल्यामुळे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लागोपाठ आठ दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांच्या खाली आढळली आहे. अशा परिस्थिती देशात कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, अशा परिस्थितीत ‘डेल्टा प्लस’ हा नवा विषाणू आढळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT