Aarey tree felling challenged before Supreme Court Aarey Forest Update  sakal
देश

Aarey Carshed : याचिकेवरील पुढील सुनावणी १० ऑगस्टला; एकही झाड न तोडण्याचे निर्देश

शिंदे-फडणवीस सरकारनं आरे येथील कारशेडवरील बंदी उठवल्यानंतर या ठिकाणी पुन्हा झाडतोड झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आरे येथील कारशेडविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. तोपर्यंत राज्य सरकारला आरेमधील एकही झाड न तोडण्याचे निर्देश दिले. (Next hearing about Aarey CarShed on August 10 Instructions not to cut any tree)

आजच्या सुनावणीत दोन महत्वाच्या गोष्टींवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं. एक म्हणजे दहा तारखेला नवं खंडपीठ या प्रकरणावर सुनावणीसाठी नेमलं जाणार आहे. तसेच तोपर्यंत एकही झाड तोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकाकर्त्यांवर गंभीर आरोप केला.

याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप मेहता यांनी केला. याचिकारर्त्यांनी कोर्टात जे फोटो सादर केले आहेत ते खोटे आहेत. इतर कुठल्यातरी जागेवरचे हे फोटो त्यांनी कोर्टात सादर केले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, सन २०१९ मधील आदेश कायम ठेवत पुढील सुनावणीपर्यंत आरेमधील एकही झाड न तोडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

SCROLL FOR NEXT