Birbhum violence_West Bengal 
देश

बीरभूम हत्याकांडाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुओमोटो दाखल

पश्चिम बंगालमधील या घटनेत घरांना लावलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम हत्याकांडाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगानं याप्रकरणी सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली असून आयोगाकडूनच या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. (NHRC has taken suo motu cognizance of killings in Birbhum district of West Bengal)

राष्ट्रीय मानावाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष न्या. अरुण मिश्रा म्हणाले, "बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या प्रकरणी स्वतःहून याचिका दाखल केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतः NHRC ची विशेष टीम करणार आहे"

बीरभूमी जिल्ह्यातील बोगतुई गावात मंगळवारी भीषण घटना घडली. यामध्ये काही घरांना समाजकंटकांकडून आग लावण्यात आली होती. या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना समोर येताच बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेवर अनेकांनी बोट ठेवलं असून या घटनेची मोठ्या प्रमाणावर निंदा करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राजकीय स्तरावर अशा घटनांचं समर्थन करणाऱ्यांना जनतेनं माफ करु नये, असं आवाहन PM मोदी यांनी केलं होत. त्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनीही यावर टिप्पणी करताना पंतप्रधान मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली तेच आपलं म्हणणं असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT