night curfew sakal
देश

पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

उत्तरप्रदेशमध्येही देखील वीकेंड कर्फ्यू लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, चंडीगड : देशभरातील कोरोना (Corona) वाढत चालला असल्याने विविध राज्यांनी आता खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध अधिक कठोर करायला सुरूवात केली. पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. आता उत्तरप्रदेशमध्येही देखील वीकेंड कर्फ्यू लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

झारखंडमध्ये शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निर्बंधांबाबत उद्या (ता.५) रोजी निर्णय होऊ शकतो.मुंबई आणि दिल्लीतील संसर्ग वाढत असल्याने पश्चिम बंगाल सरकारने आठवड्यातून तीन वेळाच या शहरांसोबतची विमानसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब सरकारने रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला असून सिनेमागृहे आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवली जातील. रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत लोकांना अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडता येणार नाही.

३३ डॉक्टरांना संसर्ग

डॉक्टरांना देखील कोरोनाचा संसर्ग होऊ लागला असून उत्तरप्रदेशातील लखनौच्या मेदांता रुग्णालयातील ३३ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब उघड झाली आहे..

यूपी तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

अलाहाबाद ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी माहिती उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आज दिली.

देशभरात ...

  • तृणमूलचे नेते बाबूल सुप्रियो व कुटुंबीयांना संसर्ग

  • नालंदा वैद्यकीय महाविद्यालयातील ७२ डॉक्टर पॉझिटिव्ह

  • दिल्लीत ‘एम्स’ने डॉक्टरांच्या हिवाळी सुट्ट्या रद्द केल्या

  • भाजप नेते मनोज तिवारी कोरोना पॉझिटिव्ह

  • छत्तीसगडमध्ये ‘सीआरपीएफ’च्या ३८ जवानांना संसर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT