Nikki Murder Case esakal
देश

Nikki Murder Case : शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे; फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेत हळूहळू...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः मागील काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये फ्रिज कांड सुरु आहे. आताही एक निक्की नावाची तरुणी साहिल नावाच्या तरुणाच्या हातून मारली गेली अन् फ्रिजमध्ये पोहोचली. या धक्कादायक घटनेने देश हादरुन गेला आहे.

दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे साहिल गेहलोत आणि निक्की यादव या दोघांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेच्या चार दिवस आधीच साहिलने प्रेयसी निक्की यादवची गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर शवविच्छेदन अहवाल समोर आलेला असून यामध्ये अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

बुधवारी निक्की यादवच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. दिल्लीतल्या दीनदयाळ रुग्णालयात हे पोस्टमार्टम झालं. डॉक्टरांनी सांगितलं की, निक्कीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. पोस्टमार्टमध्ये मृतदेहावर कुठलीही जखम आढळलेली नाही.

हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टमसाठी दोन तासांपेक्षा जास्तीचा कालावधी लागला. साहिलने निक्कीचा मृतदेह तब्बल चार दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलेलं आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, निक्कीचा खून करुन जास्त वेळ झाल्याने मृतदेह हळूहळू खराब होत चालला होता.

निक्की यादवच्या मृतेदेहावर हरियाणा येथील झज्जरच्या खेडी खुम्मार गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या गावामध्ये शोककळा पसरली होती. दिवसभर गावकरी मृतदेहाची वाट बघत होता. रात्री ५ वाजून ४८ मिनिटांनी एका अॅम्ब्युलन्समधून मृतदेह गावात आणण्यात आला. परंतु फक्त ७ मिनिटं मृतदेह घरात ठेवण्यात आला त्यानंतर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT