Nirav Modi News
India Speeds Up Efforts for Nirav Modi’s Extradition :फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आलाय. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांचे संयुक्त पथक पुढील आठवड्यात लंडनला जाणार आहे.
भारतात पाठवल्यास आपला छळ होण्याचा धोका आहे, असा दावा नीरव मोदीने केलाय. त्याच्या या दाव्याला उत्तर देण्यासाठी ही टीम क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसला (सीपीएस) मदत करेल. एजन्सींचे म्हणणे आहे की हे दावे दिशाभूल करणारे आहे आणि भारतात कडक सुरक्षा व्यवस्था आहे.
याशिवाय, तपास यंत्रणेचे पथक असेही युक्तिवाद करेल की नीरव मोदीला प्रत्यार्पण रोखण्यासाठी अपील दाखल करण्याची सवय आहे आणि त्याचे जामीन अर्ज यूकेच्या न्यायालयांकडून किमान १० वेळा फेटाळले गेले आहेत. अशाप्रकारे तपास यंत्रणेचे पथक नीरव मोदीच्या प्रत्येक युक्तिवादाला जोरदार उत्तर देणार आहे.
या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्टमिन्स्टर न्यायालयाने नीरव मोदीचा प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करण्याची विनंती मान्य केली होती. तर भारत सरकारने नीरव मोदीला परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु काही कायदेशीर प्रक्रियांमुळे हा खटला अडकत होता. मात्र, यावेळी लंडन न्यायालय नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला परवानगी देईल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.