देश

'निर्भया'ला त्याच दिवशी मिळणार न्याय?; बक्‍सर कारागृहात फाशीची तयारी सुरु

वृत्तसंस्था

पाटणा : "निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी लवकरच होणार असल्याचे दिसत आहे. बिहारमधील बक्‍सर कारागृहाला या आठवड्याअखेरिस फाशी देण्याचा दोर तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही प्रसारमाध्यमांच्या अंदाजानुसार या महिनाअखेरिस शिक्षेची अमलबजावणी होणार आहे. निर्भयावर 16 डिसेंबरला दिल्लीत सामुहिक बलात्कार झाला होता, त्यादिवशीच तिला न्याय मिळण्याची शक्यता आहे.

फाशीचा दोर तयार करणारे बक्‍सर कारागृह हे राज्यातील एकमेव आहे. या तुरुंगाला दोर तयार करण्याचा आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आला आहे. मात्र हा आदेश कुणी व कशासाठी दिला याची कल्पना तुरुंग प्रशासनाला नाही. बक्‍सर तुरुंगाचे अधीक्षक विजयकुमार अरोरा यांनी याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. ते म्हणाले, "सुमारे दहा दोर 14 डिसेंबरपर्यंत तयार ठेवण्याची सूचना आम्हाला गेल्या आठवड्यात मिळाली. हे दोर कोठे वापरायचे आहेत, याची कल्पना आम्हाला नाही. बक्‍सर तुरुंगात फार पूर्वीपासून फाशीचे दोर तयार केले जातात. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फासावर लटकवण्यासाठी याच तुरुंगातून तयार केलेल्या दोराचा वापर केला होता. 2016-17 मध्ये आम्हाला त्यासाठी पतियाळा तुरुंगातून आदेश मिळाले होते. मात्र, त्याचा उद्देश तेव्हा आम्हाला माहीत नव्हता.'' 

फाशीच्या एका दोरासाठी सात हजार 200 कच्चे धागे वापरले जातात. तो तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. हे सर्व काम हाताने केले जाते. पाच-सहा कैदी यावर काम करतात. याची लड तयार करण्यासाठी यंत्राचा वापर होतो. या आधी तुरुंगात तयार केलेल्या दोराची किंमत एक हजार 725 रुपये होती. लोखंड आणि पितळ यांच्या भाव ज्याप्रमाणे असतील तसे दोराच्या किंमतीत बदल होत जातो. कैद्याच्या गळ्याभोवती दोर आवळला जाण्यासाठी या धातूंचा उपयोग होतो, असे अरोरा म्हणाले. 

फाशीसाठीचे दोर तयार करण्याची माहिती असणारे पुरेसे कैदी कारागृहात असल्याने एवढ्या कमी कालावधीत दहा दोर तयार करण्यास काही अडचण येणार नाही. मागणीनुसारच असे दोर तयार केले जातात. ते आधी तयार करून साठवून ठेवले तर ते वापरायोग्य राहत नाहीत. 
- विजयकुमार अरोरा, बक्‍सर तुरुंगाचे अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

काव्याला रिअर लाईफ पार्थ मिळाला! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील ज्ञानदाचं ठरलं लग्न, गुपचूप उरकला साखरपुडा, मेहंदीचा VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांचा साखर कारखाना ग्रामस्थांनी बंद पाडला

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसह आरोपींना कोर्टाचा दणका, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती

SCROLL FOR NEXT