nitin gadakari excluded from parliamentary committee of bjp  
देश

भाजपच्या संसदीय समितीत महाराष्ट्राला स्थान नाही, नितीन गडकरीही बाहेर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजपच्या निवडणूक बोर्ड आणि संसदीय समितीची घोषणा करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या निवडणूक समितीचे सदस्य असणार आहेत, तर भाजपच्या संसदीय समितीवर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला स्थान देण्यात आलेले नसून नितीन गडकरी आणि शिवराजसिंग चौहान या नेत्यांना डावलण्यात आले आहे.

भाजपसाठी संसदीय समिती ही सर्वोच्च समिती मानली जाते, सर्व महत्वाचे निर्णय हे या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या माध्यमातूनच घेतले जातात, दरम्यान या संसदीय समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या समितीतून बाहेर करण्यात आले आहे. तर त्यांच्याएवजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एडीयुरप्पा आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सरमानंद सोनोवाल यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. अकरा जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा समावेश या समितीमध्ये होईल अशी चर्चा होती मात्र त्यांना देखील या समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या निपडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे, त्या निवडणूक समितीमध्ये देखील महत्वाचे निर्णय घेतले जातात. ही समिती निवडणूकीतील तिकीट वाटपासंबंधी निर्णय घेते, या समितीत महाराष्ट्राचे एकमेव नेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. संसदीय समितीत जे पी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, एडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, श्री. के लक्ष्मण, एक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायन जटीया आणि बी. एल संतोष असे अकरा जण या समितीमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT