Nitin Gadkari
Nitin Gadkari 
देश

नितीन गडकरींना पुन्हा भोवळ; प्रकृती स्थिर

वृत्तसंस्था

शिमला : किन्नौर जिल्ह्यातील प्रचार सभा उरकून शिमला येथे एका हॉटेलवर परतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. या वेळी तत्काळ डॉक्‍टरांना बोलावण्यात आले; मात्र गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून स्पष्ट करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराची धामधूम संपल्यानंतर गडकरी कुटुंबासह शिमला येथे रवाना झाले. खासगी दौरा असतानाही त्यांनी सांगला येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत सहभाग घेतला. तेथून ते शिमला येथे हॉटेलवर परतले. त्या वेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तातडीने डॉक्‍टरांना बोलावण्यात आले.

सुरक्षेच्या कारणास्तव गडकरींवर हॉटेलमध्येच उपचार केले जात असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनक राज यांनी सांगितले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या ट्विटर हॅण्डलद्वारे स्पष्ट करण्यात आले. चुकीच्या बातम्यांवर कोणी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. a

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT