देश

पेट्रोल दरवाढीतून धडा घ्या; केंद्रीय मंत्री गडकरींनी दिला सल्ला

सकाळवृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असूनदेखील देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे. ज्या पेट्रोलची मूळ किंमत फक्त 31 रुपये आहे त्यासाठी ग्राहकांना मात्र 90 रुपयांच्यावर किंमत मोजावी लागत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये सध्या संतापाची भावनाही आहे.

याबाबत आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी असूनही पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतो आहे. मात्र या सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला व भारतीयांना झपाट्याने वळावे लागेल, हा यातून घेण्यासारखा धडा असल्याचे मत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अधोरेखित केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पेट्रोल डिझेलच्या देशांतर्गत किमती कमी होण्याची चिन्हे नसताना गडकरी यांनी यावर सांगितले की देशाला इलेक्‍ट्रिक वाहने, जैवइंधन, सीएनजी यासारख्या पर्यायी इंधनांकडे वेगाने वळावे लागेल. सार्वजनिक बससेवाच नव्हे तर विमानेही पर्यायी ऊर्जेवर चालविण्याचे तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करावे लागेल.

गडकरींनी आपला स्वतःचा ट्रॅक्‍टर सीएनजीवर नुकताच परावर्तित केला होता. त्याबाबतची नियमावलीही रस्ते व महामार्ग मंत्रालयाने बनविल्याने देशातील मोठ्या शहरांच्या जिल्ह्यांत सीएनजीवर चालणारे ट्रॅक्‍टर मोठ्या संख्येने दिसतील असे गडकरी यांचे स्वप्न आहे. ते म्हणाले की इलेक्‍ट्रिक उर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकर साध्य होऊ शकते. कारण देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होते.

ते म्हणाले की देशात ८१ टक्के लिथीयम बॅटरीचे उत्पादन करण्याचे प्रयत्न माझ्या मंत्रालयाने वेगवान केले आहेत. लिथीयम हे अतिशय चांगले पर्यायी इंधन बनू शकते. त्याचप्रमाणे हायड्रोजन इंधनाच्या पर्यायाचीही चाचपणी सुरू आहे.

कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलच्या छप्परतोड महागाईवरून नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लावल्याची टीका होत असली तरी हे दर कमी करण्याची सरकारची तयारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठ दिवसांत केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा कहर केल्याचे चित्र आहे.

मात्र या पेट्रोलियम दरवाढीतून मिळणारा पैसा केंद्र जनकल्याणाच्या योजनांसाठीच वापरते असा दावा पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच केला होता. दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर आज ८९.२९ रुपये तर प्रति लिटर डिझेलचे ७९.७० रुपये इतके झाले. मुंबईत हेच दर अनुक्रमे ९५.७५ रुपये प्रति लिटर व ८६.७२ रुपये लिटर इतके आहेत. दररोज दरबदल होण्याच्या काळात उद्याचा दिवस आणखी किती दरवाढ घेऊन उगवणार याची शाश्‍वती कोणालाच नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT