Nitin Gadkari 
देश

'टोल'चा झोल होणार समाप्त; वसुलीसाठी हायवेंवर GPS ट्रॅकर, गडकरींची संसदेत घोषणा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, सरकार पुढील एका वर्षात सर्व टोल प्लाझा समाप्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. येणाऱ्या काळात टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जेवढा ते रस्त्याचा वापर करतील. अमरोहामधून BSP चे खासदार असणाऱ्या कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर जवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझा असण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की गेल्या सरकारमध्ये रस्ते परियोजनेच्या कंत्राटामध्ये थोडी आणखी मलाई टाकण्यासाठी असे अनेक टोल प्लाझा बनवले गेले आहेत, जे टोल प्लाझा नगरपालिका हद्दीत आहेत, ते निश्चितच चुकीचं असून अन्याय करणारं आहे.

नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं की, आता जर या टोल प्लाझांना हटवायला जावं तर रस्ते बनवणारी कंपनी भरपाईची मागणी करेल. मात्र, सरकारने आता पुढील एका वर्षामध्ये सगळेच टोल समाप्त करण्याची योजना बनवली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, टोल समाप्त करण्याचा अर्थ टोल प्लाझा समाप्त करणे असा आहे. आता सरकार अशा एका टेकनिकवर काम करत आहे, ज्यामध्ये तुम्ही हायवेवर जिथून याल, तिथून GPS च्या मदतीने कॅमेरा आपला फोटो घेईल आणि जिथून आपण हायवेवरुन उतराल तिथला एक फोटो घेईल. त्यामुळे थोडक्यात, जेवढ्या रस्त्याचा वापर होईल तेवढाच टोल आपल्याला भरावा लागेल. 

आजपर्यंत अनेकदा टोल प्लाझांमुळे सातत्याने होणाऱ्या ट्राफिक जाम आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा सातत्याने उचलला गेला आहे. आता केंद्र सरकारने सर्व नॅशनल हायवेवर फास्टॅगच्या सुविधेला लागू केलं आहे. त्यामुळे रांगेत उभं न राहत ऑटोमॅटीक पद्धतीने टोल भरता येऊ शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT