Nitin Gadkari On Electric Vehicle Sakal
देश

'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत'

सकाळ डिजिटल टीम

देशात वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, प्रदुषण (Pollution) कमी करण्यासाठी सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहने (Electric Vheicle) खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे, या दरम्यान इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी दिलासादायक माहिती दिली .

इलेक्ट्रिक वाहने चालवण्याचा खर्च कमी असला तरी ही वाहने पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या वाहनांपेक्षा बरीच महाग असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते विकत घेणे परवडत नाही, दरम्यान याबद्दल नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणि बाईक (Electric Bike) ची किमत ही पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या किमती एवढी होईल, तसेच येत्या काळात आम्ही सर्वसामान्य लोकांना पर्यायी इंधन वापरण्याचा पर्याय देत आहोत, असे देखील त्यांनी सांगीतले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, येत्या काळात नवीन गाडयांची किंमत ही 35 टक्क्यांनी कमी होईल. एवढेच नाही तर जुन्या गाडया भंगारात काढल्या नंतर प्रदूषणही कमी होईल. दरम्यान भारतीय बाजारात वाढत असलेली इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहाता अनेक वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉंच करत आहेत. तसेच या वाहनांना ग्राहकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: तुमचं लक्षही नव्हतं अन् लोकसभेत ३ मिनिटांत मोठा निर्णय! २:१२ ला सादर, २:१५ ला मंजूर; प्रत्येकाच्या कामाची माहिती

Women's Asia Cup: महिला आशिया करंडकाबाबत संभ्रम; अजून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

DY Patil Story: एका पराभवाने सोडलं राजकारण अन् बनले शिक्षणमहर्षी! डॉ. डी. वाय पाटील यांची प्रेरणादायी वाटचाल

Latest Marathi News Live Update : आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद

Amravati Kidney Donation: सासूने किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन; शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ७५ वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

SCROLL FOR NEXT