Nitin Gadkari Video
Nitin Gadkari Video  esakal
देश

Nitin Gadkari Video : नितीन गडकरींना यापूर्वी चारवेळा आली होती भोवळ; नेमका त्रास काय?

संतोष कानडे

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. भर उन्हात नेत्यांच्या सभा सुरु आहेत. उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकजण खबरदारी घेत आहे. त्यातच भाजप नेते नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवळ आल्याची घटना घडली.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामधल्या पुसद येथे आयोजित सभेमध्ये भाषणासाठी उभे राहिलेल्या गडकरींना अचानक भोवळ आली. त्यांच्या अंगरक्षकाने आणि उपस्थितांनी त्यांना सावरलं अन् खुर्चीवर बसवलं.

भोवळ आल्यानंतर नितीन गडकरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी गडकरी हे पुसदमध्ये होते.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा बुधवारचा शेवटचा दिवस असून काही वेळात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. गडकरींना शुगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास असल्याचं सांगितलं जातं. निवडणुकीच्या प्रचारातील धावपळ झाल्यामुळे असा त्रास होऊ शकतो.

यापूर्वी गडकरींना कधी आली भोवळ?

  • 2018च्या डिसेंबर महिन्यामध्ये नितीन गडकरी यांना पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमामध्ये भोवळ आली होती. राहुली कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत सुरु असतानाच त्यांना भोवळ आली होती. त्यानंतर त्यांना चॉकलेट देण्यात आलं होतं. मग त्यांची प्रकृती स्थिर झाली.

  • दुसरी घटना शिर्डीमध्ये घडली होती. एप्रिल २०१९ मध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शिर्डी येथे आयोजित सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.

  • तिसरी घटना ऑगस्ट २०१९मध्ये सोलापूर येथे घडली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली.

  • चौथी घटना नोव्हेंबर २०२२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांना भोवळ आली. सिलिगुड येथील दागापूर येथील जाहीर सभेमध्ये त्यांना भोवळ आली होती.

  • पाचवी घटना ही बुधवार, दि. २४ एप्रिल रोजी घडली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या पुसद येथे जाहीर सभेदरम्यान त्यांना भोवळ आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT