Mansukh Mandviya ANI
देश

देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले...

विनायक होगाडे

नवी दिल्ली : ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटमुळे सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये सर्वांत आधी आढळलेला हा व्हेरियंट आता आपले हातपाय हळूहळू पसरत असल्याचं दिसतंय. मात्र, भारतात या व्हेरियंटचा धोका किती आहे आणि आपण चिंता करण्याचं कारण कितपत आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आता ओमिक्रॉनसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये बोलताना त्यांनी म्हटलंय की, विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हा सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे.

पुढे ते म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. सध्या आपल्याकडे अनेक संसाधने आणि प्रयोशाळा आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करु शकतो. आज सध्याच्या घडीला देशात कोरोनाचा एकही नवा व्हेरियंट ओमिक्रॉने संक्रमित रुग्ण सापडल्याची नोंद झालेली नाहीये. तसेच हा विषाणू देशात येऊच नये, यासाठी हर पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

Dharavi Redevelopment: मुंबईतील हिरवळीवर पालिकेचा घाला! धारावी पुनर्विकासासाठी ८,००० झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT