Naresh Kartik Sakal
देश

22 शाळांनी नाकारला प्रवेश; मुलीसाठी मिळवलं 'ना जात ना धर्म' प्रमाणपत्र

प्रवेश अर्जावर जात आणि धर्माचे रकाने रिकामे ठेवल्याच्या कारणावरून त्यांच्या मुलीला शाळेंनी प्रवेश नाकारला होता.

दत्ता लवांडे

कोईम्बतूर : तामिळनाडू मधील एका व्यक्तीने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीला सरकारकडून ना जात ना धर्म प्रमाणपत्र मिळवले आहे. नरेश कार्तिक असं या व्यक्तीचं नाव असून त्याने आपल्या लहान मुलीला शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर जात आणि धर्माचे रकाने रिकामे ठेवले म्हणून प्रत्येक शाळेने मुलीचा प्रवेश नाकारला होता. त्यानंतर कार्तिकने हा निर्णय घेतला आहे.

(No Caste No Religion Certificate For School Admission)

कोईम्बतूर येथे राहणारे नरेश कार्तिक हे व्यवसायिक आहेत. त्यांनी त्यांच्या विलमा या साडेतीन वर्षाच्या मुलीला शाळेत प्रवेशासाठी अर्ज केले होते पण खूप शाळेंनी त्यांच्या मुलीचा प्रवेश अर्ज नाकारला होता. कारण त्यांनी प्रवेश अर्जावर जात आणि धर्म नमूद केला नव्हता. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला आणि सरकारकडून अधिकृन 'ना जात ना धर्म' प्रमाणपत्र मिळवून घेतले आहे. त्या प्रमाणपत्रात 'जीएन विलमा ही कोणत्याही धर्माची किंवा जातीची नाही' असं लिहिलेलं आहे.

"राज्य सरकारने १९७३ आणि त्यानंतर २००० मध्ये शाळेच्या प्रवेश अर्जात जात आणि धर्माचे रकाने रिकामे ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. पण शाळेच्या प्रशासनाला याबद्दल माहिती नाही." असं नरेश कार्तिक बोलताना म्हणाले आहेत. "त्यानंतर जेव्हा मी त्यांना सरकारच्या आदेशाच्या प्रती दाखवल्या तेव्हा शाळेतील प्रशासन गोंधळून गेले होते, त्यांना सरकारने याबद्दल माहिती द्यायला हवी. आमच्यासारख्या लोकांचा वेगळा गट निर्माण करावा अशीही मागणी मी सरकारकडे केली" असं कार्तिक माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान कार्तिकने आपल्या मुलीच्या प्रवेशासाठी तब्बल २२ शाळेत अर्ज केला होता पण त्या सर्व शाळेंनी त्यांचे प्रवेश अर्ज प्रलंबित ठेवले होते. धर्म आणि जात रकाने रिकामे न ठेवल्याचं कारण प्रत्येक शाळेने त्यांना दिलं होतं. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीला सर्व जाती धर्मातून मुक्त केलं आहे. 'ना जात ना धर्म' प्रमाणपत्र मिळाल्यावर नरेश यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर माझ्या मुलीसाठी मी मिळवलेले प्रमाणपत्र जनजागृती निर्माण करण्यासाठी कामी येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT