NO Complete Banned On Cannabis center google
देश

देशात गांजावर पूर्णपणे बंदी नाही, केंद्राची हायकोर्टात माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात गांजाच्या वापरावर पूर्णपणे बंदी (NO Complete Banned On Cannabis) नाही. कारण कायद्यानुसार त्याचा वैद्यकीय आणि वैज्ञानिक वापर करण्यास परवानगी आहे, असे केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयाला (Delhi High Court) सांगितले. औषधी उपयोगांसह विविध कारणांसाठी गांजाचा वापर कायदेशीर करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी केंद्राने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

ग्रेट लीगलायझेशन मूव्हमेंट इंडिया ट्रस्टने ही याचिका दाखल केली असून यामध्ये गांजा हा कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी मदत करतो, असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये एडीपीएस कायद्याच्या तरतुदींना देखील आव्हान दिले आहे. गांजाचे औषधी आणि औद्योगिक फायदे आहेत, असा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे. तसेच या याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे. मात्र, न्यायमूर्ती राजीव शखदर यांच्या खंडपीठाने त्यांची विनंती अमान्य केली आहे.

''केंद्राने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून राज्य सरकारनांना कोणत्याही गांजाची लागवड, उत्पादन, उत्पादन यासाठी परवानगी, नियंत्रण आणि नियमन करण्याचे अधिकार दिले आहेत. वैद्यकीय, वैज्ञानिक आणि औद्योगिक उद्देशांसाठी गांजाची विक्री, खरेदी, वापर (चरस वगळून) वाहतूक, आंतर-राज्य आयात, आंतर-राज्य निर्यात या सर्वांसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने कायदेशीर मार्गाने ही परवानगी दिली असून कायद्याचे उल्लंघन केले नाही. एनडीपीएस कायद्यांतर्गत गांजावर पूर्ण बंदी नाही. परंतु, संबंधित राज्य सरकारांकडून आवश्यक परवानग्या घेऊन वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक, बागायती उद्देशांसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो'', असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सादर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT