Congress Gaurav Gogoi_No confidence Motion in Loksabha 
देश

No-Confidence Motion: आम्हाला सत्ता नाही तर शांतता हवी! अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत काँग्रेसचे मोदींना 'हे' ३ सवाल

जळत्या मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावं यासाठी विरोधकांनी हा प्रस्ताव आणला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : No-confidence motions : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावानिमित्त आज लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेसनं मणिपूरच्या विषयावर पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसचे आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी हे प्रश्न विचारले. (No confidence motions in LokSabha against Modi Govt Congress asked three questions to PM Modi)

अविश्वास प्रस्ताव मणिपूरवर चर्चेसाठी आणला

गौरव गोगोई म्हणाले, लोकसभा अध्यक्षांचे आभार की त्यांनी आमचा INDIA आघाडीचा प्रस्ताव स्वीकारला. हा प्रस्ताव आणावा लागला ही आमची मजबुरी आहे. हा अविश्वास प्रस्ताव आम्ही मणिपूरबद्दल आणला आहे. मणिपूच्या महिला, पुरुष, विद्यार्थी, शेतकरी न्याय मागत आहेत. मणिपूर जळतोय तर भारतही जळतो आहे. मणिपूरमध्ये आग लागली तर भारतात आग लागली आहे.

पंतप्रधानांचं मौनव्रत तोडण्यासाठी प्रस्ताव

हा फक्त मणिपूरचा नाही तर भारताचा विषय आहे. पंतप्रधानांनी सभागृहात बोलावं एवढीच आमची अपेक्षा होती. पण पंतप्रधान यांनी मौनव्रत धारण केलं आहे, त्यांचं हे मौनव्रत तोडण्यासाठी हा प्रस्ताव आम्हाला आणावा लागला. मणिपूरमध्ये शांतता नाही. इथं सुरु असलेला हिंसाचार हा काही पहिला हिंसाचार नाही. मी स्वत: त्या भागातील आहे, एवढा राग आम्ही यापूर्वी कधीही पहिला नव्हता.

PM मोदींना विचारले तीन सवाल

डबल इंजिनच मणिपूरचं सरकार फेल झालं आहे, हे मान्य करावे लागेल, असं सांगत यावेळी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन सवाल विचारले आहेत.

प्रश्न 1 - मोदी मणिपूरला का गेले नाहीत?

प्रश्न 2 - मोदी मणिपूरवर का बोलत नाहीत ? बोलले तर 37 सेकंद का? इतर मंत्री या विषयावर बोलतात पण मोदी का बोलत नाहीत?

प्रश्न 3 - मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हाकालपट्टी का केली नाही? इतर राज्यांमध्ये आपण मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का बदललं नाही?

असे सवाल काँग्रेसनं इंडिया आघाडीच्यावतीनं उपस्थित केले.

गोगोईंनी कुठले मुद्दे मांडले?

  • जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांनी सांगितलं की, मी पुलवामाबाबत पंतप्रधानांना कॉल केला तेव्हा त्यानी शांत बसायला सांगितलं.

  • मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत होता तेव्हा मोदी कर्नाटकात मतं मागत होते.

  • आसाममध्ये आमचं सरकार असताना तिथं राजीव गांधी यांनी सरकार बरखास करण्याचं सांगितलं होतं.

  • आम्हाला सत्ता नाही तर आम्हाला उत्तर पूर्वांचलमध्ये शांतता हवी आहे.

  • राजीव गांधी मणिपूरमध्ये गेले होते मग मोदी मणिपूरला का जात नाहीत.

  • 2002ला गुजरातमध्ये दंगे झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तिथं जाऊन आले.

  • मोदींनी लोकसभेत आणि राज्यसभेत येऊन बोलावं.

  • मोदींनी मणिपूरल जाऊन यावं. सर्वपक्षीय घेऊन गेले तर आम्ही यायला तयार.

  • मोदींनी सर्व संघटनांची बैठक घ्यावी.

  • तुम्ही कितीही द्वेष पसरवा, आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही मुहब्बत की दुकान उघडलं आहे.

  • आम्हाला वाटत आहे की शेतकरी, फिटर यांचा विकास व्हावा, कुठल्या एका व्यावसायिकाचा विकास नाही.

  • भारत जिंकणार, INDIA जिंकणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT