देश

'नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवडीत हस्तक्षेप करणार नाही'

कोणाला मंत्री करावे किंवा नाही यावर मी हस्तक्षेप करणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B.S. yediyurappa) यांनी शुक्रवारी नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवडीत आपण हस्तक्षेप करणार नसल्याचा पुनरुच्चार केला. आपण पक्षाला बळकट करण्यासाठी काम करत राहणार असल्याचे सांगून नवीन मुख्यमंत्री बसवराज (CM basavaraj bommai) बोम्मई पक्ष नेतृत्वाशी सल्लामसलत करून आपली टीम निवडण्यास मोकळे असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्महत्या केलेल्या आपल्या चाहत्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी चामराजनगर जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बोम्मई आज दिल्लीत आहेत, ते केंद्रीय नेत्यांशी चर्चा करतील आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असावे, यावर निर्णय घेतील. कोणाला मंत्री करावे किंवा नाही यावर मी हस्तक्षेप करणार नाही. पक्षांतर केलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात सामील करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, यावर निर्णय घेण्यास बोम्मई मुक्त आहेत, ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेतील.

येत्या काही दिवसांत पक्षाला बळकटी देण्यासाठी मी राज्यभर प्रवास करणार आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मी तसे आश्वासन दिले आहे. गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक आठवड्यात एखाद्या जिल्ह्याचा दौरा करून संघटना बळकट करण्यासाठी कार्यकारिणीच्या बैठका घेणार आहे.

चाहत्याने केलेल्या आत्महत्येवर बोलताना ते म्हणाले, त्याने केलेल्या आत्महत्येने मला दु:ख झाले आहे, असे होऊ नये. त्यांची आई व दोन बहिणी आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही, कुटुंबाची काळजी घेणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून मी त्याच्या आईला पाच लाख रुपये दिले आहेत. त्यांच्या बँक खात्यात आणखी पाच लाख रुपये जमा करण्यात येतील व त्यातून त्यांना व्याज मिळेल. त्यांच्यासाठी आणखी काय करता येते ते पाहू.

लोकांचे प्रेम व आपुलकी

जिल्ह्यात आल्यावर लोकांनी केलेल्या स्वागताचा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री म्हणाले, सत्तेत नसतानाही लोकांच्या प्रेम आणि आपुलकीचे हे उत्तम उदाहरण आहे. माझ्या राजीनाम्याबद्दल पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. सत्ता कायम नसते, मी इतरांना मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा दिला आहे. बसवराज बोम्मई राज्यात चांगले काम करतील, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT