India-Myanmar Free movement: 
देश

India-Myanmar Free Movement: भारत-म्यानमारमध्ये मुक्त संचारावर पूर्ण बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान होणाऱ्या मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान होणाऱ्या मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रालयाने लष्कराला सूचना दिल्या आहेत. म्यानमारमध्ये सुरु असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.(no free movement between India and Myanmar Big decision of Central Government Amit shah)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केलं की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी भारत आणि म्यानमारमधील मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारमध्ये यादवी सुरु आहे. त्यामुळे अनेक म्यानमारचे लोक ईशान्य भारतात घुसखोरी करत आहेत. त्यामुळे ईशान्य भारतात या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोणातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

म्यानमार आणि भारतादरम्यान कुंपण घालणार असल्याचं अमित शहा यांनी याआधी जाहीर केलं होतं. वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात म्यानमारी सैनिक भारतात आश्रय घेत होते. त्यानंतर अमित शहा यांनी अभेद्य कुंपण घालणार असल्याची माहिती दिली होती. म्यानमार-भारतादरम्यान १६४३ किलोमीटरची सीमा आहे. या सर्व सीमेवर कुंपण घातले जाणार आहे. पेट्रोलिंगसाठी देखील वेगळी व्यवस्था केली जाणार आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये ६०० पेक्षा अधिक म्यानमारच्या सैनिकांनी भारतात प्रवेश केला आहे. या सैनिकांनी मिझोरामच्या लंगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. म्यानमारमधील यादवी पाहता ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच म्यानमारच्या राखाईन प्रांतातील रोहिंग्या मुस्लीम देखील भारतात अनधिकृतपणे येत आहेत. याला आळा घालण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचं अमित शहा म्हणाले. (Marathi Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT