rajnath singh de 
देश

कोणी 'माई का लाल' शेतकऱ्यांपासून जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार लक्ष्य केलं. नवीन कायदे लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होईल. नव्या बदलाचे चांगले फायदे दिसून येण्यासाठी काहीवेळ जावा लागेल. पुढच्या एक ते दीड वर्षात काय बदल होतात हे शेतकऱ्यांनी पाहावं. शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्यास आम्ही चर्चेद्वारे कायद्यांमध्ये सुधारणा करु, असं सिंह म्हणाले आहेत. 

राजनाथ सिंहानी विरोधकांवरही टीका केली. दुर्दैवी आहे की ज्या लोकांना शेतीबाबत काही माहिती नाही, असे लोक निष्पाप शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. एमएसपी थांबवण्याचा आमच्या सरकारचा कोणताही इरादा नाही किंवा भविष्यातही आम्ही तसं करणार नाही. बाजारपेठा देखील तशाच ठेवण्यात येतील. कोणता 'माई का लाल' शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावून घेऊ शकत नाही, अस राजनाथ सिंह म्हणाले. 

नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक? माजी IAS अधिकाऱ्याला केलं राष्ट्रीय अध्यक्ष

यूपीए जेव्हा सत्तेमध्ये होती, तेव्हा हिमाचल प्रदेशला 22,000 कोटी रुपये मिळाले. पण जेव्हा पंतप्रधान मोदी केंद्रात आले, त्यांनी याच्या तीन पट जास्त पैसे हिमाचल प्रदेशला दिले. मोदींनी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या क्षमतेनुसार मदत केली, असंही ते म्हणाले. जय राम ठाकूर यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला हिमाचल प्रदेशमध्ये तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील जनतेशी व्हर्चुअल पद्धतीने संवाद साधला. 

दरम्यान, कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करत आहे, तर विरोधी पक्ष या कायद्यांना जोरदार विरोध करत आहे. नव्या कृषी कायद्यांमध्ये कॉर्पोरेट कंपन्याचा फायदा होईल, तसेच शेतकऱ्यांना बड्या कंपन्यांच्या मर्जीवर रहावं लागले, असा दावा विरोधकांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT