Massage e sakal
देश

स्त्री-पुरुषांना एकमेकांकडून मसाज करून घेता येणार नाही; पार्लरसाठी नवे नियम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. महिलांना पुरुषांकडून आणि पुरुषांना महिलांकडून मसाज करून घेता येणार नाही आणि पार्लरचा मुख्य दरवाजा देखील पारदर्शक असावा, असा नियम आहे. गुवाहाटी महापालिकेने (Guwahati municipal corporation) हा नवा आदेश काढलेला आहे.

गुवाहाटी महापालिकेचे आयुक्त देवाशीश शर्मा यांनी हे आदेश काढले आहेत. काही युनिसेक्स पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार वाढले असून त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. या सर्व प्रकाराचा समाजातील चांगल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक नैतिकतेचा आदर करण्यास महापालिका बांधील आहे. त्यामुळे हे नवीन आदेश काढण्यात आले आहेत, असे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.

नवीन नियमांनुसार, गुवाहाटीमधील पार्लर, स्पा सलूनमध्ये स्वतंत्र खोल्या किंवा चेंबर देखील बनविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मुख्य दरवाजे पारदर्शक असावे. युनिसेक्स पार्लर, स्पा, ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलूनसाठी काही अटींसह महापालिकेकडून परवाने देण्यात येणार आहे.

पार्लर, स्पा सेंटरसाठी आम्ही नवी नियमवली जाहीर केली असून आता महिलांना पुरुषांकडून आणि पुरुषांना महिलांकडून मसाज करता येणार नाही. काही आस्थापनांमधील गैरप्रकारांबाबत आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन नवीन नियम तयार करण्यात आले आहेत, असे गुवाहाटी महापालिकेचे सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT