Vaccination esakal
देश

लसीचा तिसरा डोस घ्यावा लागणार का? केंद्रानं कोर्टात दिली माहिती

नामदेव कुंभार

कोरोना रोखण्यासाठी जगभरात लसी दिली जात आहे. काही लसीचा एक बुस्टर डोस आहे. तर काही ठिकाणी दोन डोस झाल्यानंतर तिसऱ्या डोसला सुरुवात केली आहे. दोन्ही डोसनंतरही शरीरातील कोरोनाविरूद्धची प्रतिपींडे (ॲन्टीबॉडी) कमी होत असल्याचे ‘लान्सेट’च्या शोधनिबंधातून स्पष्ट होते. त्यामुळेच भारतातही कोरोनाप्रतिबंधक लसीचा तिसरा डोस दिला जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्यातच केरळ येथील कन्नूरमधील गिरीश कुमार यांनी लसीचा तिसरा डोस दिला जावा यासाठी कोर्टात याचिका केली होती. या सुनावणीदरम्यान केंद्राकडून तिसरा डोस दिला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर तिसरा डोस घेण्याची कोणतीही तरतूद नाही. तिसऱ्या डोसबाबात अद्याप कोणतीही मार्गदर्शक सूचनाही नाहीत. त्यामुळे लसीचा तिसरा डोस देता येणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केरळ उच्च न्यायालयात दिले. यावेळी केंद्राने असेही स्पष्ट केले की, कोरोना लसीचा तिसरा डोस घेतल्यानंतर लसीच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर तिसऱ्या डोसबाबत निर्णय घेण्यात येईल.

लसीचा तिसरा डोस दिला जावा, यासाठी कन्नूरमधील गिरीश कुमार यांनी याचिका दाखल केली होती. सौदी अरेबियात काम करणारे गिरीश कुमार सध्या भारतात असून त्यांनी कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. मात्र, विदेशात कोव्हॅक्सनला परवानगी मान्यता नाहीय. त्यामुळे गिरीश कुमार यांना सौदी अरेबियाला जात येत नाही. नोकरी गमावण्याचा धोका लक्षात घेऊन गिरीश यांनी दोन डोस घेतल्यानंतरही तिसरा डोस दिला जावा, अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी केंद्राने कोरोना लसीचा तिसरा डोस देणार नाही, असे सांगत स्पष्ट शब्दांत नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT