Kalicharan Kalicharan
देश

गांधींबाबत बेताल बोलणारा कालीचरण म्हणतो, 'मला त्याबाबत पश्चात्ताप...'

सकाळ डिजिटल टीम

उज्जैन: महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली होती. धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड आणि महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली होती. इतकं सगळं झाल्यानंतरही कालीचरण महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसून येतंय. (Kalicharan Maharaj)

कारण आता कालीचरण महाराजाने उज्जैनमध्ये आपण त्या वक्तव्यांवर ठाम असल्याचं म्हटलंय. कालीचरणने म्हटलंय की, मी माझ्या वक्तव्यावर स्थिर आहे. ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, राणा प्रताप महाराजांना पथभ्रष्ट म्हटलं त्या व्यक्तीचा मी द्वेष करतो. माझी ती मते मी विचार करुनच मांडली होती. मला त्याबाबत कसलाही पश्चात्ताप नाहीये.

काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. तसेच त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवेही गायले होते. त्याच्या त्या वक्तव्यानंतर त्याच्यावर रायपूर, अकोला आणि पुण्यात देखील तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गायब झालेल्या कालीचरणला शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT