देश

चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; कारागृहातील मुक्काम वाढला

पीटीआय

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी आरोप असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने तीन ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली आहे. न्यायाधीशांनी त्यांच्या वैद्यकीय तपासणीलाही परवानगी दिली आहे. 

चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली होती. चिदंबरम यांना सर्वप्रथम तुरुंगात पाठविले, त्या वेळच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नसल्याने न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवून द्यावी, असे सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले.

मेहता यांच्या मागणीला चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र याला विरोध केला. चिदंबरम यांना विविध आजार असून त्यांचे वजनही कमी झाले आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी आवश्‍यक आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. यावर मेहता यांनी कायद्याअंतर्गत चिदंबरम यांच्यावर सर्व उपचार, तपासण्या केल्या जातील, असे सांगितले. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत तीन ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur: स्त्रीबीज प्रकरणातील आठवा आरोपी जेरबंद, खोट्या वैद्यकीय अहवालाचा पर्दाफाश

'खाली काही लपवलं आहे का? म्हणत चुकीचा स्पर्श' अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव, म्हणाली...'ज्यांचे ब्रेस्ट मोठे त्यांना...'

Samay Raina: समय रैना Osho आणि अष्टवक्र गीतेमुळे बदललाय? पॉडकास्टमधलं वक्तव्य चर्चेत; पाहा Viral Video

Jalna Crime: भायगव्हाण शिवारात जुगार अड्ड्यावर धाड; 32 जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

Latest Marathi News Live : कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT