delhi Video 
देश

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Aam Aadmi Party: नोएडामध्ये आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्याच्या मुलाची दादागिरी पाहायला मिळाली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नोएडामध्ये आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्याच्या मुलाची दादागिरी पाहायला मिळाली आहे. नोएडातील सेक्टर ९५ मध्ये आपचे नेते आणि आमदार अमानातुल्लाह खान (AAP Delhi MLA Amanatullah Khan) यांच्या मुलाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. ६ मे रोजी हा प्रकार समोर आला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आप आमदाराच्या मुलाची दादागिरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानातुल्लाह खान हे सुद्धा पेट्रोल पंपावर (employees at the petrol pump ) पोहोचले होते. त्यांनी देखील तेथील कर्मचाऱ्यांना धमकावलं आहे. याप्रकरणी आप आमदार आणि त्यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप आमदाराचा मुलगा पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आला होता. रांग मोडून तो आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले. याचा त्याला राग आला. आमदाराच्या मुलाने त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्यात आला असून यात सर्व प्रकार कैद झाला आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने आप आमदाराच्या मुलाला रांगेत येण्यास सांगितलं. पण, याच कारणामुळे त्याला राग आला. त्याने आणि त्याच्या काही मित्रांनी कर्मचाऱ्यांना मारहाण सुरु केली. धक्कादायक म्हणजे आप आमदार खान देखील या घटनेनंतर पेट्रोल पंपावर पोहोचले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकवल्याची माहिती आहे. शिवाय आपल्या मुलाला प्राधान्य दिले जावे असं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं कळतंय.

सदर घटनेसंदर्भात आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अमानातुल्लाह खान पोलीस स्टेशनमध्ये येतात, तेव्हा उपस्थित पोलीस उभे राहून त्यांना मान-सन्मान देत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय पोलीस संतापलेल्या खान यांना समजावून सांगत असल्याचं दिसतंय. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोषींना न्याय मिळेल का असा प्रश्न लोक विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे अचानक ११ मतदार वाढले, मोठ्या पक्षाचा पाठिंबा; काँग्रेस म्हणते, विश्वासघात

Nepal Protests : नेपाळही बांगलादेशच्या वाटेवर? देशात होणार सत्तापालट? 'या' पाच मागण्यांसह रस्त्यावर उतरले तरुण...

Medical Admission Update : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना ४०० नव्या जागांची मान्यता; यूजी काउन्सिलिंग २०२५ मध्ये समावेश

संगमनेर शहर हादरलं! 'इंदिरानगरमध्ये पत्नीचा खून करून पतीने जीवन संपवले'; दोघांमध्ये वारंवार भांडणे, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Updates: धुळ्यात स्कुटी आणि एसटी बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT