Mannu Bhandari esakal
देश

Mannu Bhandari : प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे निधन

हिंदीतील प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिंदीतील प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी (Mannu Bhandari) यांचे आज सोमवारी (ता.१५) निधन झाले. त्यांच्यावर हरियानातील एका दवाखान्यात उपचार सुरु होते, अशी माहिती त्यांची मुलगी रचना यादव यांनी सांगितले. आँखो देखा झूठ, आपका बंटी या लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. भन्नू भंडारी यांचा जन्म ३ एप्रिल १९३१ मध्ये झाला होता. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्यातील (Hindi Literature) एका पिढीचा शेवट झाला आहे. भोपाळ येथे जन्मलेल्या भंडारी या नवकथा आंदोलनाच्या भाग होत्या. या आंदोलनाची सुरुवात निर्मला वर्मा, राजेंद्र यादव, भीष्म साहनी, कमलेश्वर या सारख्या लेखकांनी केली होती. मन्नू भंडारी अशा लेखिका होत्या, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील महत्त्वाकांशी महिलांच्या कथा लिहिल्या आहेत.

त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांत महिला पात्रांचे संघर्ष आणि समाजातील त्यांची स्थितीचे चित्रण केले गेले आहे. त्यांची महिला पात्र जुन्या रुढीपरंपरा तोडताना, स्वातंत्र अस्तित्वाची गोष्टी सांगताना दिसते. प्रसिद्ध लेखक राजेंद्र यादव हे त्यांचे पती होते. त्यांच्यासह मन्नू भंडारी यांची पहिली कादंबरी 'एक इंच मुस्कान' १९६१ मध्ये प्रकाशित झाली होती. ही कादंबरी त्यांनी राजेंद्र यादव यांच्यासह लिहिली होती. ती खूप लोकप्रिय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Winter Session : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी आंदोलन; आक्रमक विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

‘3 इडियट्स 2’ येणार? रॅंचो–राजू–फरहान पुन्हा म्हणणार ‘ऑल इज वेल’

Leopard Issue : बिबट प्रश्नी पाच दिवसांत उपाययोजना; नाईक, बावनकुळे यांची विधानसभेत ग्वाही

Dakkhan Bull Story : हवं तर माझा जीव घ्‍या... पण ‘दख्खन’ द्या..! बैलमालकाच्या मायमाउलीचा टाहो; सांगलीतील मैदानातून हरवल्‍याने आर्त हाक

Kolhapur Pune Accident : पुणे नवले पुलासारखा अपघात कोल्हापुरात; सायबर चौकात ५ वाहनांची भीषण धडक, नियंत्रणासाठी उपाययोजना होणार का?

SCROLL FOR NEXT