Notification issued by Indian Army for Agniveer Recruitment
Notification issued by Indian Army for Agniveer Recruitment Notification issued by Indian Army for Agniveer Recruitment
देश

अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी; जुलैपासून नोंदणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारतीय लष्कराने (Indian Army) आवश्यक अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलैमध्ये सुरू होईल. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील आहे. जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. (Notification issued by Indian Army for Agniveer Recruitment)

अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा पदवी मिळणार नाही. याशिवाय सैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या कॅन्टीनची सुविधाही अग्निवीरांना मिळणार नाही. अग्निवीरांना कोणताही महागाई भत्ता किंवा लष्करी सेवा वेतन मिळणार नाही. भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार (Notification) आठवी आणि दहावी उत्तीर्ण युवकही अर्ज करू शकतात.

अग्निवीरांच्या पहिल्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलै महिन्यात सुरू होईल. ८३ भरती मेळाव्यातून सुमारे ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागले. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. अधिसूचनेनुसार आर्मीमध्ये अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्या मिळतील.

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती मेळावे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आयोजित केले जातील. डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सुमारे २५,००० भरतीचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांची दुसरी तुकडी २३ फेब्रुवारी २०२३ च्या सुमारास प्रशिक्षण सुरू करेल. सुमारे ४०,००० जवानांच्या निवडीसाठी देशभरात एकूण ८३ भरती मेळावे घेण्यात येणार आहेत.

या पदांसाठी होणार भरती

  • अग्निवीर जनरल ड्युटी

  • अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/एम्‍यूनेशन)

  • अग्निवीर लिपिक/स्टोअरकीपर तांत्रिक

  • अग्निवीर ट्रेड्समैन दहावी पास

  • अग्निवीर ट्रेड्समैन आठवी पास

अग्निवीरांचा इतका असेल पगार

अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

किती दिवस रजा मिळणार?

अग्निवीरांना वर्षभरात एकूण ३० सुट्या मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आजारी पडल्यास किती दिवसांची रजा द्यायची, हे आजाराबाबत ठरवले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT