देश

देशाला आता 'चौकीदार' नाही तर 'पेहरेदार'ची गरज : ओवेसी

वृत्तसंस्था

कल्याण : मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा वाहत होता. तेव्हा देशाचे 'चौकीदार' कुठं होते? जितके 'चौकीदार' बनले ते सगळे चोर आहेत. त्यामुळे आता 'चौकीदार' बदलण्याची वेळ आली आहे. देशाला आता 'चौकीदार' नाही तर 'पेहरेदार'ची गरज आहे, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज (रविवार) अप्रत्यक्ष निशाणा साधला. 

कल्याण येथे वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ओवेसी बोलत होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. ओवेसी म्हणाले, ''दलित, कोळी, मुस्लिमांनो आता रडणे, तक्रारी करणे बंद करा. उठा आपण सर्व मिळून त्यांना धडा शिकवू. ज्या लोकांनी गेल्या 70 वर्षांत रडवले''. तसेच 280 जागा मिळूनही ते रोहित वेमुलाला वाचवू शकले नाहीत. कोरेगाव भीमासारखी घटना रोखू शकले नाहीत, असेही ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, आतापर्यंत किती दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना भारतरत्न दिला गेला आणि किती उच्चवर्गीय लोकांना भारतरत्न दिला गेला? हा माझा प्रश्न आहे याचं उत्तर द्या. 

दरम्यान,  डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणखी 10-15 वर्षे जिवंत राहिले असते, तर देशात रोहित वेमुलाचा मृत्यू झाला नसता. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्न पूर्ण नाही केले त्यांना मतं द्या. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आमच्यासोबत आहे. त्यामुळे आपण त्यांना साथ द्यायला हवी.

मोदींची चमकेगिरी करणारा मंत्री केंद्रात

संसदेत दलित समाजातील एक मंत्री आहे. मी त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. मला वेदना होतात, की ते मोदींची चमचेगिरी करतात, अशा शब्दांत ओवेसींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT