Fastag_
Fastag_ 
देश

आता गाड्यांवर Fastag असणं अत्यावश्यक; अन्यथा टोल नाक्यावर बसणार मोठा भूर्दंड

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 1 जानेवारी 2021 पासून विना फास्टॅग लावलेल्या गाड्या टोल लेनवरुन गेल्या तर त्यांना दुप्पट टोल द्यावा लागू शकतो. नव्या व्यवस्थेसाठी टोल नाक्याच्या संचालकांनी तयारी सुरु केली आहे. तसेच 15 डिसेंबर पासून सर्व टोल नाके कॅशलेस होतील. असे असले तरी कॅश लेनही सुरु राहील. यावेळी विना फास्टॅग गाडी मालकांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. टोलवरुन जाणाऱ्या गाड्यांच्या आकड्य़ावरुन स्पष्ट होतंय की अजूनही 25 टक्के गाड्या विना फास्टॅग आहेत. 

टोल कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार, लोकांना फास्टॅगसंबंधी जागरुक केले जाईल. टोल नाक्यावर खासगी एजेंसीचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील, जे फास्टॅगची औपचारिकता पूर्ण करतील. दुसरीकडे काही बँकांनीही आपले कँम्प उभे केले आहेत. टोक नाक्यावर दोन लेन विना फास्टॅग असणाऱ्या गाड्यांसाठी सोडण्यात आले आहे. अशा पद्धतीने उत्तर प्रदेशातील अन्य टोल नाक्यांवरही सर्व लेन फास्टॅगचे केले जाणार आहेत. 

वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारताच रावसाहेब दानवेंनी काढला पत्रकार परिषदेतून...

मेरठमधील सीवाया टोल नाक्यावरुन दररोज 35 हजारांपेक्षा अधिक गाड्या जातात. यातील जवळजवळ 5 हजार गाड्या विना फास्टॅग असतात. नवीन गाड्यांमध्ये फास्टॅग आधीपासून असते, पण जून्या गाड्यांमध्ये फास्टॅग उपलब्ध नसते. पेटीएम, एअरटेलपासून एनएचएआयपर्यंत सर्वांकडून फास्टॅग पुरवले जात आहे. एआरटीओच्या अधिकारी श्वेता वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना रेग्युलर जिल्ह्याच्या बाहेर जायचं नसतं, अशांनी फास्टॅग सुविधा घेतलेली नाही. व्यावसायिक गाड्यांना फास्टॅग लावण्यात आले आहेत. आता लोकांना फास्टॅग लावणे आवश्यक असणार आहे, कारण त्यांना दुप्पट टोल द्याला लागू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT