remdesivir tablet  
देश

कोरोनावर प्रभावी ‘रेमडेसिवीर’चे होणार भारतात उत्पादन; 'या' दोन कंपन्या करणार उत्पादन..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप औषध आलेलं नाही. मात्र, ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोना विषाणूवर प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले असून दरम्यान, आता या औषधाचं उत्पादन आणि विक्री दोन्ही भारतात होण्यास परवानगी मिळाली आहे. भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.

‘रेमडेसिवीर’चे उत्पादन भारतात होणार असून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. दरम्यान, रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवं होतं. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही आयात थांबवण्यात आली आहे. मात्र, आता या औषधाचं भारतातच उत्पादन होणार असल्याने कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी दिली आहे.

या दोन कंपन्या करणार उत्पादन आणि विक्री:

ज्यांना कोरोनाची लागण झाली असून जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत केवळ त्यांच्यासाठीच रेमडेसिवीर हे औषध वापरण्यात येणार आहे. म्हणजेच गंभीर रुग्णांसाठी या औषधाचा वापर केला जाईल. यासाठी या औषधाचं उत्पादन आणि विक्रीसाठी हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी रात्री ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला.

राज्यात ही सुरू होणार क्लिनिकल ट्रायल: 

उद्या रेमडेसिवीरबाबतची कागदपत्र सरकारकडे सोपवली जाणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतातील दोन कंपन्या हेटेरो आणि सिप्ला यांना याबाबतची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मागणी केली जाणार आहे. त्यानुसार, राज्यात लवकरच रेमडेसिवीरची क्लिनिकल ट्रायल केली जाईल," असं समन्वय अधिकारी डॉ. आकाश खोब्रागडे यांनी म्हंटलंय.

now remdesivir tablets will produced in india  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT