Nitin-Gadkari
Nitin-Gadkari 
देश

आता इलेक्ट्रिक बॅटरीवर लवकरच ट्रॅक्टर : गडकरी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी केवळ महानगरे आत्मनिर्भर बनून चालणार नाही त्यासाठी ग्रामीण भारत आत्मनिर्भर बनवावा लागेल व त्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाला महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल, असे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मंत्रालयातर्फे लवकरच इलेक्‍ट्रिक बॅटरीवर चालणारा ट्रॅक्‍टर तयार करण्यात येईल, अशीही घोषणा गडकरी यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमएसएमईच्या स्फूर्ती विभागाच्या नव्या ग्रामोद्योग केंद्रांचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. आगामी काळात देशभरातील ग्रामीण भागात ५००० ग्रामोद्योग केंद्रे उभारण्याचे लक्ष्य त्यांनी मंत्रालय अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भारताच्या विकासकामात तुम्ही पैशाची चिंता करू नका, अर्थमंत्रालयाकडून पैसा कसा आणायचा हे मी पाहतो असेही गडकरींनी आपल्या खास स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना सांगितले.

ते म्हणाले, की खादी ग्रामोद्योग विभागाने शेणापासून दर्जेदार रंगाची योजना गतिमान करायला पाहिजे. ऑईलपेंट व डिस्टेंपरपेक्षा चांगला असलेला हा रंग जगातून मागणी यावी इतका दर्जेदार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT