‘एनएससीएन-आयएम’ वेगळ्या ध्वजावर ठाम sakal
देश

‘एनएससीएन-आयएम’ वेगळ्या ध्वजावर ठाम

नागा चर्चेचा पेच वाढणार, केंद्र सरकारची कोंडी

सकाळ वृत्तसेवा

कोहिमा (पीटीआय) ः नागालँडमधील नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालिमने (एनएससीएन-आयएम) आज पुन्हा कठोर भूमिका घेत वेगळा नागा ध्वज आणि राज्यघटनेच्या मागणीवर ठाम राहत याबाबत केंद्र सरकारसोबत कोणतीही तडजोड करण्यास नकार दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. नागांचा राजकीय संघर्ष आणि ओळखीची ही दोन्ही प्रतिके असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. नागा गटांच्या वेगळ्या राजकीय अस्तित्वाबाबतचा पेच दूर करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘एनएससीएन-आयएम’ या गटाने पुढाकार घेतला होता यामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर चर्चेचा नवा अध्यायही सुरू झाला होता.

नागा संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ या चर्चेमागे भारत सरकारचा हेतू चांगला नव्हता, यामुळे नागा जमातीच्या लोकांच्या ऐतिहासिक आणि राजकीय हक्कांचे उल्लंघन झाले आहे.’’ नागा संघटनांशी चर्चेमध्ये सहभागी झालेले केंद्र सरकारचे प्रतिनिधी ए.के. मिश्रा यांनी नागा नॅशनल पोलिटिकल ग्रुपच्या (एनएनपीजी) कार्यकारी समितीच्या सदस्यांशी चर्चा केली होती. ही संघटना सात नागा गटांचे नेतृत्व करते. या संघटनेने मात्र ‘एनएससीएन-आयएम’ला विरोध केला आहे. ‘एनएनपीजी’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ चर्चा ही दोन्ही बाजूंनी होणे गरजेचे आहे. यात सातत्य आणि उद्दिष्टांप्रतीची कटिबद्धता हवी. ज्या ठिकाणी माजी मध्यस्थ आर.एन. रवी यांनी आणून ठेवले होते तिथून ही चर्चा पुढे न्यायला हवी.’’ दोन्ही गटांचे संबंध चांगले राहावेत म्हणून भविष्यात देखील चर्चा सुरू राहणे गरजेचे असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

म्हणून प्रश्‍न जटिल

‘एनएससीएन-आयएम’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ नागा राष्ट्रीय ध्वज आणि येझाबोच्या (राज्यघटना) मुद्द्यांमुळे हा प्रश्‍न अधिक जटिल झाला आहे. याबाबत केंद्र सरकारची भूमिका फसवणुकीची आहे. केंद्र सरकारला जेव्हा नागांचा राजकीय प्रश्‍न हाताळणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी फसवणुकीचे धोरण अवलंबायला सुरूवात केली. नागांच्या ध्वजाला एक दैवी अधिष्ठान असून त्याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही.’’ दरम्यान या संघटनेने ३ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्र सरकारसोबत करार केला होता पण त्यातूनही फारसे निष्पन्न झाले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT