NEET Exam: NTA Released Exam City Information Slip  esakal
देश

NEET 2022: NTA च्या ऑफिशिअल वेबसाईटवर Exam City Information Slip जारी

मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेची एक्झाम सिटी इंफॉर्मेशन स्लिप एनटीए ने जारी केली आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेची एक्झाम सिटी इंफॉर्मेशन स्लिप एनटीए ने जारी केली आहे.या स्लिपमधे परीक्षार्थीच्या परीक्षेचे शहर आणि परीक्षाच्या सुचना जारी केल्या आहेत.एनटीएने याआधीही सांगितले होते की विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीनुसार सगळ्यात जवळ पडणारे परीक्षा केंद्र देण्यात येईल.लवकरच परीक्षेचे प्रवेशपत्रही जारी केले जाईल.

परीक्षार्थी एनटीएच्या ऑफिशिअल वेबसाईटवर neet.nta.nic.in वरून त्यांची सिटी अलॉटमेंट स्लिप डाऊनलोड करू शकतील.वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी घेण्यात येणारी UG NEET ही परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.तसेच ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

Admit Card विद्यार्थी असे डाऊनलोड करू शकतील

अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर eet.nta.nic.in या वेबसाईटवर जावे.

होम पेजवर दिसणाऱ्या लिंक NEET admit card वर क्लिक करावे.

त्यानंतर नवीन पेज उघडेल ज्यात विद्यार्थास त्याचे लॉग ईन डिटेल्स भरावे लागतील.

स्क्रिनवरील अॅडमिट कार्ड विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात किंवा त्यांच्या गरजेनुसार प्रिंटही करू शकतात.

नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केली होती पण त्यांच्या मागणीकडे स्वास्थ विभागाने दुर्लक्ष केले.(CUET) सीयूईटी आणि यूजी नीट या विद्यालयात प्रवेशासाठीच्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने विद्यार्थांना अभ्यासात अडचण येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे पडले होते.यावर्षी नीटसाठी तब्बल १८ लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत.मागल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अडीच लाख विद्यार्थी जास्त आहेत.त्यामुळे परीक्षेता कट ऑफ सुद्धा जास्त असणार आहे.यावर्षी एमबीबीएसच्या ९०८२५ जागा तर बीडीएसच्या २७९४८,आयुषच्या ५२७२० तर बीएससी नर्सिंगच्या ४८७ जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Yadav Family Dispute : रोहिणी नंतर आता आणखी तीन बहि‍णींनी नाते तोडले, लाल प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह थांबेना

Sharad Pawar: सरसकट पैसे वाटण्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करू: शरद पवार : काँग्रेस संपेल असे वाटत नाही, नेमकं काय म्हणाले?

राज्यात गारठा वाढणार! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट, तर मुंबई-पुणेही गारठलं; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Capricorn Horoscope 2026: लव्ह लाईफमध्ये चढ-उतार...तर सिंगल व्यक्तींसाठी लग्नाच्या संधी; वाचा तुमचं वार्षिक राशीभविष्य

आजचे राशीभविष्य- 17 नाेव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT