नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येमध्ये रोज विक्रमी वाढ सुरूच असून मागील चोवीस तासांत, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वाधिक ६ हजार ६५४ नवीन रुग्ण आढळले असून १३७ लोकांनी प्राण गमावले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दुसरीकडे आज संध्याकाळी चारपर्यंत आलेल्या सुधारित आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशात आणखी २८ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यात राजधानी दिल्लीतील सर्वाधिक २३ जणांचा समावेश आहे दिल्ली सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही दिल्लीतील मृतांचा आकडा वाढला आहे. देशात १५ मेपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा दर ९ टक्क्यांवर येईल हा पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील विशेष गटाचा अंदाज प्रत्यक्षात उलटाच ठरला असून १५ मे नंतरच देशात दररोज नवे कोरोनाग्रस्त आणि मृत्युमुखी पडणारे यांच्या संख्येत भयावह वाढ झाल्याचे चित्र आहे.
मे महिन्यातील उद्रेक : (दर २४ तासांमधील आकडेवारी)
१६ मे - ४७९४
१७ मे ५०४९
१८ मे ५०६५
१९ मे ६१५४
२० मे ५५४७
२१ मे ६०२५.
२२ मे ६६५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.