नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल सकाळ
देश

नुपूर शर्मा आणि नवीन कुमार यांची पक्षातून हकालपट्टी, आखाती देशांमध्ये वातावरण तापलं

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये भारताविरोधात नाराजी आहे.

सकाळ डिजिटल टीम

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur sharma) आणि नेते नवीन कुमार जिंदाल (Naveen jindal) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली असून या देशांमधील असलेली नाराजी सध्या भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. या आखाती देशांमध्ये बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य अनेक देशांचा समावेश आहे. (Nupur sharma and naveen jindal suspended from bjp due to controversial statement about muhmmaada Paigambar

आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्य करतात. या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. या देशांमधून रोजगारासाठी स्थलांतरीत असलेल्या भारतीयांकडून 40 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम भारतात येतात. याशिवाय राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. आखाती देशाच्या मदतीने व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि वित्त सेवांमध्ये भारताला मदत होते. त्यामुळे आखाती देशाची नाराजी या भारतीयांना महागात पडू शकते.

काश्मीरच्या मुद्यावर भारत -पाकिस्तानमध्ये अनेकदा वाद पाहायला मिळाला. त्या प्रत्येक वेळी आखाती देश भारताच्या बाजूला कायम उभे राहिले. मात्र आता या दोन भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याने त्यांची भारताप्रती नाराजी चिंतेचे कारण ठरू शकते.

नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशी वादग्रस्त वक्तव्ये भाजपच्या धोरणांविरोधात आहेत. त्यामुळे नुपूर शर्मा आणि जिंदाल यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, असे भाजपने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT