Supreme Court on controversial statements muslim community of suspended BJP Nupur Sharma legal experts opinion
Supreme Court on controversial statements muslim community of suspended BJP Nupur Sharma legal experts opinion sakal
देश

नूपुरचा शिरच्छेद करण्याला देणार घर; अजमेर दर्ग्याच्या खादिमांचा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

अजमेर : कन्हैयालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण अद्याप थंडावले नाही तोच सुफीवादाचे शहर म्हणवल्या जाणाऱ्या अजमेरमधून वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा आहे. व्हिडिओमध्ये खादिम सलमान चिश्ती भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविषयी बोलत आहे.

सलमान चिश्ती दर्गा पोलिस स्टेशनचे हिस्ट्रीशीटर देखील आहे. त्यांनी नूपुर शर्माचा शिरच्छेद (beheaded) करणाऱ्याला आपले घर देणार असल्याचे म्हटले आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडानंतर धर्माच्या नावाखाली देशातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ताजे प्रकरण अजमेरचे आहे. खादिम सलमान चिश्ती यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ कन्हैयालालच्या हत्येपूर्वी मारेकरी रियाझ मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांनी तयार केलेल्या व्हिडिओसारखाच आहे. सुमारे दोन मिनिटे पन्नास सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सलमान चिश्ती नूपुर शर्माला (Nupur Sharma) धार्मिक भावना दुखावल्यामुळे ठार मारण्याची उघडपणे धमकी देत ​​आहे. वेळ पहिलीसारखी राहिलेली नाही. नाहीतर बोललो नसतो. जो कोणी नूपुर शर्माची मान कापून आणेल त्याला माझे घर देऊन निघून जाईन, असे व्हिडिओमध्ये सलमान चिश्ती म्हणाला.

खादिम सलमान चिश्तीचा व्हिडिओ व्हायरल (Provocative video) झाल्यानंतर अजमेर शहरातील अलवर गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओबाबत पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत कडक आहे. व्हिडिओमध्ये सलमान चिश्ती मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. त्याचा शोध सुरू आहे, असे अजमेरचे एएसपी विकास सांगवान यांनी सांगितले.

भारतातील मुस्लिम (Muslim) तालिबानी मानसिकता कधीही स्वीकारणार नाही. कोणताही धर्म मानवतेच्या विरोधात हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही, विशेषत: इस्लाम. सर्व शिकवणी शांततेचे स्रोत म्हणून कार्य करतात, असे अजमेर दर्गा दिवाण जैनुल आबेदीन अली खान यांनी कन्हैयालालच्या हत्येनंतर म्हणाले होते.

देशात संतापाचे वातावरण

भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्माच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणाऱ्या कन्हैयालालची हत्या करण्यात आली होती. कन्हैयालालची हत्या करणारे आरोपी रियाझ आणि गौस मोहम्मद यांनी हत्येनंतरही व्हिडिओ बनवून धमकी दिली होती. या निर्घृण हत्येनंतर देशात संतापाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT