Devendra Fadnavis esakal
देश

ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन आम्ही आश्वासन पूर्ण केलं - देवेंद्र फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीत आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा पार पडली. ओबीसींच्या हक्काचं संरक्षण आमचं सरकार करेल तसेच ओबीसींच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, ओबीसींच्या हितासाठी राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केला असल्याचं फडणवीसांनी बोलताना सांगितलं.

(Devendra Fadnavis on OBC Reservation)

आमच्या सरकारच्या काळात २०१४ पासून २०१९ पर्यंत आम्ही ओबीसींच्या हिताचे २२ निर्णय घेतले असं उपमुख्यमंत्री बोलताना म्हणाले आहेत. तर सध्या राज्यात असलेलं सरकार ओबीसींच्या हिताचं निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी नागपूर मध्ये बोललो होतो की, आमचे सरकार आले तर आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून देऊ नाहीतर मी राजकारणातून संन्यास घेईल. पण आता आमच्या सरकारने ते आश्वासन केलं आहे असंही ते म्हणाले आहेत.

सध्या राज्यात असलेलं शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे ओबीसींच्या हिताचं सरकार आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळात आज ४० टक्के मंत्री आहेत ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याचबरोबर शिक्षणात सुद्धा ओबीसींना न्याय देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. मी मागच्या तीस वर्षात राजकारणात आहे पण मी ज्या ठिकाणाहून निवडून येतो तिथे सर्व लोकं ओबीसी समाजाचे आहेत त्यामुळे ओबीसींच्या हिताचे निर्णय घेणं माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील ऊसदर आंदोलनात भाजपचा सहभाग

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT