Delhi-Violence-BSF-Jawan-House
Delhi-Violence-BSF-Jawan-House 
देश

#DelhiViolence : दंगलीत घर जळालेल्या जवानाच्या पाठीशी ओडिशा सरकार!

वृत्तसंस्था

भुवनेश्वर : सीमा सुरक्षा दलाचे जवान (बीएसएफ) मोहम्मद अनिस यांना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी रविवारी (ता.१) दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीतील दंगलीत जमावाने लावलेल्या आगीत अनिस यांचे घर जळून खाक झाले आहे.

अनिस हे सीआरपीएफच्या ९व्या बटालियनमध्ये कार्यरत असून, सध्या ते ओडिशातील नक्षलप्रभावित मलकनगिरी जिल्ह्यात तैनात आहेत. ओडिशातील स्वाभिमानांचल भागाची सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या ९व्या बटालियनकडे आहे. मुख्यमंत्री साह्यता निधीतून अनिस यांना मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

दंगलीत घर जळाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनिस यांच्या मदतीसाठी बीएसएफ पुढे आली आहे. बीएसएफच्या मदत पथकाने शनिवारी अनिस यांच्या निवासस्थानाला भेट दिली होती. 
ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीत ४२ जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दोन विशेष तपास पथके नियुक्त केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT