CM Naveen Patnaik Team eSakal
देश

ओडिशात भाजपचा सुपडा-साफ; CM पटनायक यांनी सांगितलं पराभवाचं कारण

बिजू जनता दलाने 853 पैकी 766 जागा जिंकल्या आहेत.

सुधीर काकडे

नवी दिल्ली : ओडिशाच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाला मोठा विजय मिळाला मिळाला आहे. पक्षाने केलेलं मोठं ग्राउंड कव्हरेज, कल्याणकारी योजना आणि ओडिशाचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख नवीन पटनायक यांच्या वैयक्तिक सहभागामुळेच हे सारं शक्य झाल्याचं बोललं जातं आहे. सत्ताधारी बिजू जनता दलाने आपला प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला पूर्णपणे धूळ चारली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महत्वाच्या मुद्यांवर फोकस न करणे, समन्वय नसणे, प्रचारात मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती आणि मुद्द्यांवर आधारित कोणतेही समाधानकारक वर्णन नसणे, हीच भाजपच्या पराभवाची कारणं असल्याचं म्हटलं आहे. ते पुढे म्हणतात की सीएम पटनायक यांच्यावर केलेले आरोपही पोकळ दिसत होते.

ओडिशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये BJD ने 853 पैकी 766 जागा जिंकल्या. या निकालानुसार तब्बल 90 टक्क्यांचा स्ट्राइक रेट आणि 2017 च्या निवडणुकीत 290 जागांची वाढ झाली आहे, तर भाजपला यावेळी फक्त 42 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकता आल्या आहेत. तर 2017 मध्ये 60 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ 37 जागा जिंकता आल्या.

2024 च्या देशातील आणि राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत. या निकालांतून भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2017 मध्ये भाजपने आठ जिल्ह्यांत जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकावला होता. तर यावेळी त्यांना एकही परिषद जिंकता आलेली नाही. दरम्यान, BJD राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांवर बाजी मारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT