Odisha Train Accident Sakal
देश

Odisha Train Accident: मृत्यूचं थैमान अन् प्रेताच्या ढिगाऱ्यात सुरू असलेलं मदतकार्य, पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षा कवच योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

राहुल शेळके

Coromandel Express Train Accident: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंत 238 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचे 10 ते 12 डबे या धडकेनंतर उलटले आहेत. तर दुसऱ्या गाडीचे 3 ते 4 डबे रुळावरून घसरले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. असे दिसत आहे.

यासोबतच ओडिशा सरकारने शनिवारी सर्व कार्यक्रम रद्द करत राज्यात शोक पाळण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातग्रस्तांना भरपाईची रक्कम जाहीर केली आहे.

तीन गाड्यांचा अपघात?

2 जून रोजी संध्याकाळी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस हावड्याकडे जात असताना अनेक डबे रुळावरून घसरले. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली.

यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबेही समोरून येणाऱ्या मालगाडीच्या डब्यांना धडकले. बालासोर जिल्ह्यातील बहाना बाजार स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला.

ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने सांगितले की, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा होणार नाही.

2016 मध्ये इंदूर पाटणा अपघात. इंदूर-पाटणा एक्स्प्रेस कानपूरमधील पुखरायनजवळ रुळावरून घसरली. ज्यामध्ये किमान 150 लोकांचा मृत्यू झाला.

त्याआधी, 22 मे 2012 रोजी हुबळी-बंगलोर हम्पी एक्स्प्रेस आंध्र प्रदेशजवळ मालगाडीला धडकली होती. ज्यामध्ये 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 43 जण जखमी झाले आहेत.

2010 मध्ये, मुंबईकडे जाणारी हावडा कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात रुळावरून घसरली.

या अपघातात 170 जणांना जीव गमवावा लागला. त्याच वर्षी, 19 जुलै 2010 रोजी पश्चिम बंगालमधील सैंथिया येथे उत्तर बंगा एक्स्प्रेस आणि वनांचल एक्स्प्रेस एकमेकांवर आदळल्या, ज्यामध्ये 63 लोकांचा मृत्यू झाला आणि 165 हून अधिक जखमी झाले.

अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

हावडा : 033 - 26382217

खडगपूर : 8972073925, 9332392339

बालासोर : 8249591559, 7978418322

शालीमार (कोलकाता) : 9903370746

रेलमदद : 044- 2535 4771

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : जालन्यात भोकरदनमध्ये राजकीय दिग्गजांचा सामना, रावसाहेब दानवेची प्रतिष्ठा धोक्यात

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT