ओडीशातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील एका व्यक्तीच्या अंगावर हॉटेल मॅनेजरने उकळतं तेलं फेकलं. सध्या या घटनेनं ओडीशा हादरलयं. ओडीशाच्या कटकपासून 45 किलोमीटर दूर असलेल्या बालीचंद्रपुर गावातील प्रसनजीत परिदा नावाचा व्यक्ती एका हॉटलमध्ये जेवण करायला गेला मात्र त्याला तेथील जेवण आवडले नाही.
प्रसनजीतने जेव्हा हॉटल मॅनेजरला तक्रार केली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की रागात हॉटेल मॅनेजरने प्रसनजीतवर उकळतं तेलं फेकलं. (hotel manager throw boiling oil on customer do lab test if you not like food in hotel gov will give money )
घटनेनंतर प्रसनजीतला कटक येथील SCB मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, गरम तेलामुळे प्रसनजीतचा चेहरा, मान, छाती, पोट आणि हात पूर्णपणे भाजले गेले. हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या हॉटेल मॅनेजर फरार आहे.
हॉटेलमधील जेवण आवडलं नाही तर काय करायचं, याविषयी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
जर तुम्हाला हॉटेलमधील जेवण आवडले नाही तर तुम्ही तक्रार करू शकतात.
तक्रार करण्यासाठी जेवणाचं सॅम्पल जवळच्या FSSAI (Food Safety and Standards Authority of India ) लॅबमध्ये घेऊन जा.
सॅम्पलची टेस्ट करा आणि जर त्यात काही भेसळ आढळलं तर तक्रार दाखल करा.
आरोग्य मंत्रालयानुसार जर तुम्ही टेस्ट कराल तर तुम्हाला लॅब टेस्टचे पैसे द्यावे लागेल मात्र जर लॅब टेस्ट केलेल्या जेवणात काही भेसळ मिळालं तर पैसे ग्राहकाला परत केले जाईल
FSSAI च्या https://www.fssai.gov.in/ या ऑनलाइन वेबसाइटवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
फूड कनेक्ट अ्ॅपला गूगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करा आणि त्यावर तक्रार दाखल करा.
Food Adulteration Act, 1954 2(A) च्या नुसार ग्राहकाच्या आरोग्याला धोका पोहचवणारे अन्न दिले तर संबधित गुन्हेगारावर कारवाई होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.