Suicide
Suicide sakal
देश

अग्निपथ योजनेचा पहिला बळी? सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

भारतीय सैन्यात भरती होण्याची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने लेखी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केली आहे. ओडिशामध्ये ही घटना घडली असून या विद्यार्थ्याच्या पालकांनी केंद्र सरकारच्या योजनेला यासाठी जबाबदार धरलं आहे. या योजनेविरोधात देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. (Protests against Agnipath Recruitment Scheme)

बालासोरे जिल्ह्यातल्या तेन्तेई या गावातल्या या तरुणाचं नाव धनंजय मोहन्ती असल्याची माहिती मिळत आहे. तो भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. मात्र आर्मीची परीक्षा रद्द झाल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, अग्निपथ योजना (Agnipath Recruitment Scheme) जाहीर झाल्यानंतर भारतीय सैन्याने लेखी परीक्षा रद्द केली. यामुळेच आपल्या मुलाने इतकं टोकाचं पाऊल उचललं. या मुलाने स्वतःला गळफास लावून घेतला आहे.

धनंजयच्या मित्राने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, तो माझा जवळचा मित्र होता. तो गेल्या ४ वर्षांपासून सैन्यभरतीची तयारी करत होता. त्याने दीड वर्षांपूर्वी शारिरीक क्षमतेची चाचणीसुद्धा पार केली होती. मात्र लेखी परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलली जात होती. शेवटी अग्निपथ योजनेमुळे ही परीक्षा रद्द झाली. आम्ही वयोमर्यादाही ओलांडली आहे.

धनंजयचा मित्र पुढे म्हणाला की, व्हॉटसपच्या माध्यमातून त्याला कळलं की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकत्त्यामधल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केली. हे सगळं पाहून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि काल रात्री त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने आम्हाला मेसेज पाठवला की सरकारवर विश्वास ठेवू नका आणि कधीही त्यांना मतदान करु नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT